श्रीनगर/४ एप्रिल - जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील मनगोरीपरिसरात सुरक्षा दल आणि दहशत वाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलेशनिवारी सकाळी ही चकमक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, कुलगाम जिल्ह्यातील मनगोरी परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. त्यानुसार सुरक्षा दलाने परिसराला घेरावघालून शोधमोहीम हाती घेतली. त्यावेळी दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नानघालण्यात यश आले.
कुलगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान