कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी औषध फवारणी

खली _कोरोणाचा प्रसार रोखण्यासाठी औषध फवारणी रिसोड तालुक्यातील चिखली गावात ग्रामपंचायत मार्फत औषधाची फवारणी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दि.२७/३/२० शुक्रवारी सकाळ पासून ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने औषधाची फवारणी केली आहे. गावात एकमेकांना शरीर स्पर्श नसला तरी मोठ्या प्रमाणात वस्तू स्पर्श होत आहे.ग्रामपंचायत मार्फत गंभीरता लक्षात घेऊन पूर्ण गावात औषधी फवारणी करण्यात आली. कानाकोपऱ्यात, ओठयावर, उभ्या असलेल्या गुरेढोरावर. औषधाची फवारणी करण्यात आली.सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य यांच्या मार्गर्शनाखाली हे काम हाती घेण्यात आले.